शबनम न्युज | देहुरोड
प्रतिनिधी : दिलीप सोनकांबळे
देहुरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीच्या ६८ व्या वर्धमान दिनी देहुरोड येथील धम्मभूमीच्या ठिकाणी लाखो भीम सैनिकांचा महासागर लोटला होता. त्यामुळे या ठिकाणी काहीही अनुसुचीत प्रकार घडू नये, म्हणून पोलीसांनी मोठा पोलीस बंदोस्त लावला होता. लाखो भिमसैनीक आल्यामुळे गर्दीचा फायदा घेत काही साखळी चोरांनी संधीचा फ़ायदा घेत काही महिलांचे गळ्यातील मंगळसुत्र तर काही लोकांच्या गळ्यातील चैनी चोरून नेल्या. त्यांच्या पैकी दोन चोरट्यांना स्थानिकांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले होते.
त्याच प्रमाणे देहूरोड पोलीसांनी एक महिला व एक पुरूष यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकही केली होती. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर काही वेळातच ती महिला चोर देहूरोड पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पोलीस स्टेशन मधून पळुन गेली. याबाबत अधिक तपास देहुरोड पोलीस करीत आहेत.