शबनम न्युज | पिंपरी
देशप्रेमी व स्वातंत्र्य संग्रामातला महामेरू हुतात्मा भाई कोतवाल स्वतंत्र सेनानी यांच्या स्मृतीदिनानिमित्त दापोडीतीतील हुतात्मा भाई कोतवाल स्मारक चौक येथे माजी नगरसेवक राजाभाऊ बनसोडे,स्वीकृत नगरसेवक संजय कणसे,अशोक मगर,पंकज व्यवहारे व नाभिक महासंघ पिंपरी चिंचवड शहर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्वातंत्र्यासाठी स्वतंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या या तेजस्वी क्रांतिकार्याचे मूळ नाव विठ्ठल लक्ष्मणराव कोतवाल असे. त्यांचा जन्म १` डिसेंबर १९१२ रोजी रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे नाभिक(न्हावी) कुटुंबात झाला.आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी ब्रिटिशांच्या सशस्त्र सेनेशी मुकाबला करताना दोन जानेवारी १९४३ रोजी वीर भाई कोतवाल यांना हौतात्म्य प्राप्त झाले. “भाई कोतवाल यांनी देशाच्या स्वतंत्र लढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या या बलिदानामुळेच आपणाला आपला देशाचा स्वातंत्र्यसूर्य पाहण्याचे सदभाग्य मिळत आहे.” असे मनोगत कार्यक्षम नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी राहुल शिंदे,नितीन सुरवसे सो.सुजाताताई अपुणे,यशवंत अपुणे, गणेश वाळुंजकर रामदास शिंदे मारुती कटके,अशोक पंडित,नाना रायकर,नितीन सुरवसे,ॲलेक्स दास जाफर शेख शंकर गायकवाड,महेश चौधरी,संदिप पंडित,सागर आढाव,पांडुरंग दोडके उपस्थित होते.