फुले शाहू आंबेडकर विचार मंच वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील रावेत, किवळे, मामुर्डी परिसरातील विविध प्रश्नांसंदर्भात फुले शाहू आंबेडकर विचार मंच वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणा दरम्यान, या भागातील शिवसेनेचे युवा नेते राजेंद्र तरस यांनी बी झोनल अधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या तक्रारींचा पाढा वाचला.
किवळे स्मशानभूमी, मामुर्डी स्मशानभूमी येथील जाळी बसवावी, किवळे स्मशानभूमी या ठिकाणी लाईटचा मीटर बसवणे, तसेच तरस वस्ती ,दत्तनगर या ठिकाणी रोड करणे M B कॅम्प तरस कुटुंबियांच्या घरासमोरील सर्व ड्रेनेज लाईन नव्याने टाकने व कॅम्प मध्ये ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करणे, मुतारी करणे या प्रमुख मागण्यांसह अनेक तक्रारी राजेंद्र तरस यांनी यावेळी केल्या.
तसेच राजेंद्र तरस यांच्या विविध प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत अधिकारी यांनी येत्या १५ दिवसांत मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन दिले. तरीही सदर कामे झाली नाही तर आपण शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा तरस यांनी दिला. यावेळी फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाले होते.