कु. मनीषा राठोड, भूमिका गोरे व प्रतीक्षा लांडगे यांची स्पर्धेसाठी निवड
शबनम न्युज | पिंपरी
मध्य प्रदेश येथे दिनांक ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान संपन्न होणाऱ्या ५ व्या खेलो इंडिया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाच्या कु. मनीषा राठोड, भूमिका गोरे व प्रतीक्षा लांडगे यांची सातारा येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणीतून श्री चंद्रकांत कांबळे सहसंचालक क्रीडा व युवक संचालनालय पुणे यांचे अध्यक्षतेखाली श्री शांताराम जाधव अर्जुन पुरस्कारार्थी, सचिन भोसले संघटना प्रतिनिधी, गीता साखरे तालुका क्रीडा अधिकारी यांचे समितीने निवड केली आहे.
मनीषा, भूमिका व प्रतीक्षा यांचे श्रीरंग बारणे (खासदार मावळ लोकसभा), महेश दादा लांडगे (आमदार भोसरी विधानसभा), विलासशेठ लांडे (मा. आमदार भोसरी विधानसभा), अभिषेक बारणे मा. नगरसेवक , कैलास उर्फ बाबा बारणे मा. नगरसेवक, मनीषा पवार (मा नगरसेविका) , तानाजी बारणे (सामाजिक कार्यकर्ते), बाळासाहेब खांडेकर (सहाय्यक आयुक्त क्रीडा विभाग), अनिता केदारी (क्रीडा अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका), परशुराम वाघमोडे (प्रशासनाधिकारी क्रीडा विभाग), दीपक कन्हेरे (क्रीडा पर्यवेक्षक), मनीष जगताप मुख्य लिपिक क्रीडा विभाग, डॉ.श्री अशोक पाटील प्राचार्य राजमाता भोसरी जुनिअर व सिनियर कॉलेज , डॉ. नेहा बोरसे प्राचार्य राजमाता भोसरी जुनियर कॉलेज,श्री अरुण फुगे मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव, चंद्रशेखर कदम (मा. मुख्याध्यापक), चंदन गंगावणे लेखापाल, राजेंद्र नागपुरे जूनियर टेक्निशियन आदी मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील स्पर्धेत हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सदर खेळाडूंना बन्सी आटवे क्रीडा मार्गदर्शक, श्रीमती सोनाली जाधव राष्ट्रीय खेळाडू, गोपीचंद करंडे क्रीडा मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.