शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे-नाशिक हायवे वरील मोशी टोलनाका बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आतिश बारणे यांनी राज्य सरकारला दिला आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांना आतिष बारणे यांनी दिले आहे.
आतिष बारणे म्हणाले कि, “मोशी टोल नाका मुदत संपली म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून बंद होता. आज पुन्हा राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मोशी टोल नाका सुरू करण्यात आला आहे. मोशी टोल नाका प्रकरणी राज्य सरकारने मुदतवाढ देऊ नये, ही नम्र विनंती अन्यथा पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना विनाकारण टोल भरावा लागेल. रोटरीच्या पुढाकाराने प्रीमॅच्युअर बालकांसाठी 110 बेबी वार्मर मशीन पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना शहरात टोल आकारणी म्हणजे जिझिया कर आकारणी करण्यात आली अशी परिस्थिती निर्माण झाली असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना मोशी टोल नाका या ठिकाणी टोल आकारणी सक्ती करण्यात यावी, अन्यथा मोशी टोल नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा आतिष बारणे यांनी दिला आहे.