शबनम न्युज | मुंबई
भारतीय टीम मधील फलंदाज रिषभ पंतवर दोन ते तीस तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. ३० डिसेंम्बर रोजी रिषभचा दिल्लीहून रुरकीला घरी जाताना कार अपघात झाला होता. यात तो जखमी झाला होता. मुंबईत त्याला उपचारासाठी आणणे गेले होते. आज त्याच्या गुडघ्यावर दोन ते तीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली.
तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असून तो वेगाने बरा होत आहे. डॉ. पार्डीवाला आणि त्यांच्या टीमने शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास पंतवर शस्त्रक्रिया केली जी सुमारे दोन ते तीन तास चालली.
३० डिसेंम्बर रोजी रिषभची कार दुभाजकाला धडकली. यानंतर हरियाणा रोडवेजच्या बस ड्रायव्हर आणि कंडक्टरने पंतला कारमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. पंत कारमधून बाहेर पडताच कारने पेट घेतला. त्याच्या एमआरआय स्कॅन अहवालात कोणतीही दुखापत नसल्याचे समोर आले आहे. बीसीसीआय पंतच्या सतत संपर्कात आहे. त्याचबरोबर पंत लवकर बरे व्हावा यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे.
Cricketer Rishabh Pant's knee surgery was successfully conducted yesterday at a private hospital in Mumbai. He is under the supervision of the medical team and is recovering fast: Sources
(File pic) pic.twitter.com/wtEmsTbqQE
Advertisement— ANI (@ANI) January 7, 2023