शबनम न्युज | पुणे
कुटुंबासाठी नवीन घर घेण्यासाठी कोंढवा परिसरातील एका अपार्टमेंटमधून ३७ लाख रुपयांचे दागिने चोरल्याची घटना घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे. मल्लप्पा होसमनी (वय.३१,रा. आंबेगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २५ डिसेंबर रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने २५ डिसेंबर ख्रिसमससाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या घरातून ३७,३०,३०० रुपये किमतीचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने चोरले. याप्रकरणी पोलिसांनी तपास केले असता, वेगवेगळ्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चोरीत वापरलेली दुचाकी होसमनी यांची असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्याच्यावर यापूर्वी लोणी काळभोर, हिंजवडी आणि चंदननगर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक केल्यानंतर कोंढवा येथील चोरीच्या वेळी त्याने चोरलेले सर्व दागिने पोलिसांनी जप्त केले आहे.