शबनम न्युज | नागपूर
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने दोन कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. सकाळी साडेअकरा वाजता पहिला फोन आला, त्यानंतर आणखी फोन करण्यात आले, असे तीन वेळा धमकीचे फोन नितीन गडकरी यांना करण्यात आले.
नागपूर येथील कार्यालयात नितीन गडकरी यांना तीन वेळा फोन करून दाऊदच्या नावाने ही धमकी देण्यात आली असून, दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील खामला परिसरातील कार्यालयामध्ये आज सकाळी धमकीचे फोन आले. याप्रकरणी सायबर पोलिसांची एक टीम तपास करीत आहे.
फोन कुठून आला, कोणी केला आणि का केला? याचा तपास सायबर पोलीस करीत आहेत. सध्या नितीन गडकरी सुद्धा हे नागपूर मध्येच आहे. त्यामुळे कार्यालय आणि निवासस्थानाच्या सुरक्षित वाढ करण्यात आली आहे.