शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
28 वर्षांपूर्वी पत्नीची हत्या केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. 1995 मध्ये भोसरी येथे पत्नीच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या 66 वर्षीय व्यक्तीला मावळ येथून अटक करण्यात आली. रामा कांबळे (वय 66 रा. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत. भोसरी येथे 1995 मध्ये पत्नीचा खून केलाचा आरोप असलेला कांबळे हा गुन्हानंतर आपली ओळख बदलून सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात पालापूर येथे राम बनसोडे असे नाव बदलून राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या पत्नीचे हत्यानंतर तो काही काळ एकटा राहिला, त्यानंतर त्याने मूकबधिर महिलेची लग्न केले आणि त्यांना तीन मुलेही आहेत. हे कुटुंब सध्या मावळ तालुक्यातील उर्से येथे राहत आहेत. रामा हा तिथल्या वीटभट्टीवर काम करत होता. पोलीस चौकशी दरम्यान रामाने पहिल्या पत्नीची तिच्या विश्वासूपनाचे संशयावरून हत्या केली त्यानंतर तो पालापुरला पळून गेला. त्यानंतर त्यांनी तिथे पुन्हा दुसरे लग्न केले. त्याच्या दुसऱ्या कुटुंबीयांना त्याचा भूतकाळ माहीत नव्हता पोलिसांनी रामाचा शोध सुरू ठेवला असता, राम हा मावळ येथील वीट भट्टीवर काम करत असल्याचे पोलिसांना कळाले त्यानंतर एक पथक तयार करून रामाला अटक करण्यात आली. याबाबत अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलीस करीत आहेत.