शबनम न्युज | पुणे
पुण्यात कोकेन बाळगल्याप्रकरणी टांझानियन नागरिकांसह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७.५८ लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले. बेका हमिस फौमी (वय.४६) आणि अर्शद अहमद इक्बाल खान (वय. ४२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फौमी आणि खान यांना गुरुवारी कोंढवा येथे अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांचे मोबाईल जप्त केले आणि त्यांची झडती घेतली असता 36.920 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले ज्याची किंमत अंदाजे 7,58,600 रुपये आहे. ते अवैध पदार्थ शहरात विकण्याचा कट रचत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
“फौमी हि हिस्ट्री शीटर आहे. कोकेन आणि मेफेड्रोन बाळगल्याबद्दल त्याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी येरवडा तुरुंगातून सुटल्यानंतर, फौमी पुन्हा अंमली पदार्थांच्या व्यापारात गेली,” असे निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले.