शबनम न्युज | पुणे
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीच्या मतदानाची तारीख बदलण्यात आली आहे. या दोन्ही विधानसभा मतदार संघात २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता २७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारीला ही निवडणुक पार पडणार आहे. तर २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेमुळे निवडणुकीची तारीख बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
कसबा पेठ विधानसभेतील स्व. आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभेतील स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले आहे. या जागेवर आता पोटनिवडणूक होणार असल्याची केंद्रीय आयोगाने घोषणा केली. तसेच २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असल्याचे घोषित करण्यात आले होते, मात्र बारावीच्या परीक्षा असल्याने ही तारीख बदलण्यात आली असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार २६ फेब्रुवारीला ही निवडणुक पार पडणार आहे.