शबनम न्युज | पुणे
सोशल मीडिया पोस्टवरून झालेल्या भांडणातून वारजे येथील बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना सिंहगड रोड परिसरात मंगळवारी घडली. रमेश राठोड (रा. वारजे) असे जखमीचे नाव असून, गोळीबार केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक संतोष पवार याच्या विरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड परिसरातील सनसिटी रोडवरील एका ठिकाणी दुपारच्या सुमारास पवार, रमेश राठोड व इतर काही जण एकमेकांशी बोलत असताना, एकाने पवार यांच्या बद्दल काही मजकूर व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकल्याने भांडण सुरू झाले. रमेशने मध्यस्थी केली असता, त्या भांडणात पवार यांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. या घटनेत रमेशला पायाला दुखापत झाली असून, रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी पवारला अटक केली आहे. याबाबत अधिक तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.