शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते शालेय व्यवस्था समितीचे माजी सदस्य राष्ट्रवादीचे सरचिटणीस रमजान सय्यद यांनी ध्वजारोहणास उपस्थित राहून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तसेच मुख्याध्यापक शिक्षक पालक व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी माजी स्वीकृत नगरसेवक मोहन दादा भूमकर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब विनोदे सर्वेक्षक लांडगे सर मुख्याध्यापक दशरथ कोंडावळे सर वैशाली शिंदे मॅडम शिरवले सर बावधने सर समीर सय्यद तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब विनोदे म्हणाले कि, आपण दोन-तीन वर्ष प्रजासत्ताक दिन साध्या पद्धतीने साजरा करतो, पण पुढील वर्षी प्रजासत्ताक दिन हा मोठ्या आनंदात आणि मोठ्या उल्हासात साजरा करण्यात येईल. तसेच बावधने सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.