शबनम न्युज | पिंपरी
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)च्या वतीने प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी प्रमुख अतिथी अल्फा लावल इंडिया कंपनीच्या ऑपरेशन्स विभागाच्या मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापिका संतती पाटील यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सामूहिक राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संतती पाटील यांनी आपल्या मनोगतात भारतीय संविधानाचे महत्व सांगत सर्वांनी आपल्या लोकशाही राष्ट्राचा अभिमान बाळगत आपापल्या कर्तव्यांची जाणीव ठेवावी असे आवाहन केले.
याप्रसंगी यशस्वी संस्थेच्या मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापिका मनीषा खोमणे, संस्थेचे मार्केटिंग विभाग प्रमुख प्रशांत कुलकर्णी यांच्यासह सर्व अध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच एमबीए व एमसीए चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी आदिती चिपळूणकर,अभिजीत चव्हाण,सहायक ग्रंथपाल महेंद्र कांबळे,प्रा. महेश महांकाळ यांनी विशेष सहकार्य केले. प्रा. अबोली मांडे यांनी सूत्रसंचालन केले. तर संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी आभार प्रदर्शन केले.