पिंपरी चिंचवड, 29 जानेवारी : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये ईडीने एका बँकेच्या माजी अध्यक्षच्या घरावर मोठी कारवाई केली आहे. दि. सेवा विकास बँकेचा माजी अध्यक्ष अमर मुलचांदणीसह त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना ईडीने ताब्यात घेतले आहे.
बेहिशेबी कर्जवाटप प्रकरणी ईडीने आज पिंपरी चिंचवडमध्ये छापा टाकला आहे. ईडीच्या छापेमारी सुरू असतांना घरातच लपून बसलेल्या अमर मुलचंदाणी याने मोबाईल मधील बेहिशेबी कर्ज प्रकरणाशी संबधित डेटा डिलीट करून पुरावे नष्ट केले. त्याचबरोबर अमर मुलचंदाणीला लपवून ठेवण्यासाठी तसंच पुरावे नष्ट करण्यासाठी कुटुंबीयांनी मदत केली.
अमर मुलचंद आणि सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष आहेत पिंपरी मधील मिस्ट्री पॅलेस या ठिकाणी ते राहतात या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे याच ठिकाणी ईडीने छापा मारी केली मूलचंदणी यांच्यासह इतर संचालकांवर बनावट कागदपत्रांचे आधारे 124 कर्जाचे वाटप केल्याने आणि त्यातून चारशे कोटी होऊन अधिकचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते या प्रकरणी पोलिसांनी अमल चंदन यांच्यासह पाच जणांना अटक केली होती अमर मूलचंद यांनी हे जामीनावर बाहेर आले आणि त्यानंतर आता त्यांच्या घरी छापा टाकला