पिंपरी चिंचवड : शबनम न्यूज ( वृत्तसंस्था )
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे “अणू उर्जा एक शाश्वत व कार्यक्षम ऊर्जा स्त्रोत ” या विषयावर न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुम्बई (जनता संपर्क)चे उप-महाप्रबंधक श्री अमृतेश श्रीवास्तव यांचे व्याख्यान दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी सकाळीं 11.00 वाजता आयोजित करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात दीव्यांग विदयार्थी उपस्थीत होते. मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्या साठी दुभाषी विशेष शिक्षका द्वारे संवाद साधण्यात आला.
अणू उर्जा हा अधिक कार्यक्षम व सुरक्षित ऊर्जा स्रोत असल्याचे वक्त्यांनी सांगितले. या प्रसंगी सायन्स पार्क चे संचालक श्री प्रविण तुपे यानी प्रमुख वक्त्यांचे स्वागत केले. न्यूक्लियर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तर्फे अणू उर्जा संदर्भात माहितीचे छोटे दालन सायन्स पार्क येथे उभारण्यात येणार असल्याचे श्री अमृतेश श्रीवास्तव यांनी जाहीर केले.