पुणे : श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, अध्यक्ष- विशाल तांबे संपादित `सेवेचे ठायी´ या पुस्तकाबरोबर `ज्ञानदीप´ वार्षिक नियतकालिक, १२ वा अंक, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाचा, मा. खासदार, सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आला.
त्याप्रसंगी, त्या म्हणाल्या, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इतिहासातील दीपस्तंभप्रमाणे `ज्ञानदीप´ हा वार्षिक अंक १२ वा, शैक्षणिक वर्ष: २०२१ -२२ कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर याचे प्रकाशन करताना मला स्वतःला विशेष आनंद होत आहे. हा ज्ञानदीप अंक ज्ञानाचा अखंड विलास आहे. महाविद्यालयाच्या प्रगतीचा व विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सर्व कलागुणांचे व त्यांच्या भावविश्वाचे ते खरोखर वास्तव प्रतिबिंब आहे. ज्ञानदीप महाविद्यालयाच्या प्रगतीचा आरसा व चढता प्रगतीचा आलेख आहे.
विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन जीवन हे संवेदनशील जीवन असते. अभ्यास करून निश्चित ध्येयाकडे वाटचाल तर सुरूच असते. त्याचबरोबर स्वतःमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या मनातील विचार शब्दांच्या माध्यमातून कसदार उतरवण्यासाठी, ज्ञानदीप हे एक उत्तम माध्यम आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी हा देशाचा एक उत्तम नागरिक असतो. विद्यार्थ्यांना साहित्याची ओळख हवी, त्यांच्याकडून चांगले साहित्य लिहिले व वाचले जावे, या हेतूने त्यांचे मत, भाव-भावना आर्थिक, सामाजिक दृष्टिकोन मांडण्यासाठी प्रत्येक वर्षी ज्ञानदीप हा अंक प्रकाशित केला जात असतो. श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, अध्यक्ष- मा. श्री विशाल तांबे, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून `सेवेचे ठायी´ या पुस्तकात कोरोना काळातील, कोरोना यौद्ध्यांनी केलेल्या कामाचा आलेख मांडला. यातून मानवी मूल्ये कशी जोपासण्यात आलेली आहेत ते सांगितले.
याप्रसंगी उपस्थितांमध्ये साखर आयुक्त- शेखर गायकवाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष- प्रशांत जगताप, उद्योजक- अभय मांढरे, माझी महापौर- दत्तात्रय धनकवडे, माजी नगरसेवक- किशोर धनकवडे, मा. काकासाहेब चव्हाण, मा. आप्पासाहेब रेणुसे, मा.आश्विनी भागवत, मा. श्रद्धा परांडे, मा. सचिव- श्री. वैभव तांबे, संस्थेचे कोषाध्यक्ष-मा. श्री. मयूर ढमाले, प्रशासकीय सल्लागार- मा. श्री. राजीव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य- डॉ. हंसराज थोरात, प्राचार्य- डॉ. प्रमोद इंगळे, मुख्याध्यापक- श्री. अतुल पानसरे, मुख्याध्यापिका- सौ. शीतल पाटील व कार्यकारी संपादक- डॉ. पांडुरंग मिसाळ इत्यादी होते. प्रकाशना सोहळ्याला संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे, आभार, श्री. सचिन डिबळे यांनी मानले.पसायदानाने या कार्यक्रमाचा समारोप झाला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.