शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्यास सुरुवात झाली असून, शहरातील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या पाठोपाठ आमदारांचे बंधू शंकर जगताप यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. दोघांची नावे ही उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप पैकी एकाला भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, दोघांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याने भाजपा पक्षश्रेष्ठी कोणाला एबी फॉर्म देणार हे देखील तितकंच महत्वाचे आहे.
Advertisement
दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील बंधू शंकर जगताप आणि दिवंगत आमदारांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असलेल्या अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज आणल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.
Advertisement