शबनम न्यूज | पुणे
नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आकुर्डी येथे घे भरारी पीसीएमसी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध व्यावसायिक अमित फटांगरे आणि संगीता तरडे यांच्या हस्ते करण्यात आले सदरचे प्रदर्शन 3 फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी सकाळी 11 ते 9 या वेळेत नागरिकांसाठी असणार आहे या वेळेत जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन राहुल कुलकर्णी व नीलम उमराणी एदलाबादकर यांनी केले आहे.
करोना च्या काळात अनेक छोट्या व्यावसायिकांना खूपच आर्थिक फटका बसला आहे. त्यातून वर येऊन छोट्या व्यवसायिकाना एक व्यसपीठ मिळावे यासाठी घे भरारी हा ग्रुप प्रयत्नशील असतो. ह्या प्रदर्शनात ६० पेक्षा जास्त छोटे व्यावसायिक व महिलांनी भाग घेतला आहे. उत्तमोत्तम दागिने, कपडे, परफुम्स ,कुर्ती, पर्सेस ,हातमागाच्या वस्तू, पादत्राणे, कालाकुसरीच्या वस्तू, साबणे, तांब्याच्या वस्तू, हस्तकलेच्या अनेक वस्तू ,पिशव्या ,टेराकोटा वस्तू ,खाद्यपदार्थ असे अनेक स्टॉल येथे बघायला मिळतील. त्याचप्रमाणे भरपूर शाकाहारी गरमागरम पदार्थांची पर्वणी येथे असणार आहे.
एक उत्कृष्ट वीकेंड घालवण्यासाठी आकुर्डी, PCMC मधील नागरिकांसाठी हे प्रदर्शन नक्कीच उत्साहवर्धक ठरेल यात शंकाच नाही.
अनेक व्यावसायिक त्यांच्या व्यवसायात त्यांनी मिळवलेले यश आणि त्यांच्या घे भरारीच्या साथीने झालेला प्रवास येथे बघता येईल . तेव्हा हे प्रदर्शन चुकवू नये असे अमित फतांगरे यांनी सांगितले .
या सर्व छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या प्रदर्शनाला सर्वानी जरूर भेट द्यावी असे संगीताजी या वेळी आवर्जून म्हणाल्या .
व्यावसायिकांनी व्यावसायिकांसाठी तयार केलेल्या या सोहळ्याला जरूर उपस्थित राहून अपल्या मधील व्यावसायिक तयार करण्याच्या ह्या कामात नक्की सामील व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे