शबनम न्युज | पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी प्रवेश पत्र सोमवारपासून ऑनलाइन उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाकडून पत्रक जाहीर करून देण्यात आली आहे.
https://www.mahasscboard.in/ या संकेतस्थळावर शाळा लॉगिन मध्ये प्रवेश पत्र उपलब्ध करून दिले जाईल. प्रवेश पत्र डाऊनलोड करून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून, स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना द्यावी, प्रवेश पत्रात विषयी, माध्यम बदल असल्यास त्या दुरुस्ती शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करावयाच्या आहेत. प्रवेश पत्रावरील छायाचित्र स्वाक्षरी विद्यार्थ्यांची नाव या संदर्भातील दुरुस्ती शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची प्रत विभागीय मंडळात सादर करायची आहे. प्रवेश पत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास पुन्हा प्रत घेऊन त्यावर लाल शाईने दृतिय प्रत असा शेरा नमूद करावा. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांच्या छायाचित्र चिटकवून मुख्याध्यापकाने शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी नमूद केले आहे.