शबनम न्युज | पुणे
“कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जर महाविकास आघाडी बिनविरोध निवडणुकीसाठी सहमत असेल, तर आम्ही आमचा उमेदवार मागे घेऊ आणि स्व. आमदार मुक्त टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देऊ,” असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप पक्षाचे कार्यकर्ते हेमंत रासणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या मंगळवार (दि. ०६) रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
पाटील म्हणाले, “जर मविआ किंवा काँग्रेसने बिनविरोध निवडणुकीसाठी सहमती दर्शविली तर आम्ही टिळक कुटुंबातील कोणाला तरी उमेदवारी देऊ आणि आमचा उमेदवार मागे घेऊ,” असे ते म्हणाले, तसेच याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संवाद साधणार आहोत, असे ते म्हणाले. तसेच ही निवडणूक बिनविरोध झाली तर आम्ही हेमंत रासणे यांची उमेदवारी मागे घेऊ, आणि टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देऊ, असे पाटील म्हणाले.