शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीत महाविकास आघाडीची उमेदवारी नाना काटे यांना जाहीर करण्यात आली. त्यानंतर राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजूत काढूनही राहुल कलाटे अपक्ष निवडणूक लढविण्यास ठाम आहे. त्यामुळे आता थेट ठाकरे गटाचे सचिन अहिर यांनी राहुल कलाटे यांची भेट घेतली. यावेळी राहुल कलाटे यांनी उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती सचिन अहिर यांनी केली आहे. तसेच सचिन अहिर म्हणाले की, पक्षप्रमुखांनी देखील उमेदवारी मागे घेण्यास विनंती केलेली आहे.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवट दिवस असताना, राहुल कलाटे आपले उमेदवारी मागे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यावेळी बोलताना सचिन आहेर यांनी सांगितले कि, थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राहुल कलाटे यांच्यासोबत फोनवर चर्चा करून अर्ज मागे घेण्यास विनंती केली.