शबनम न्युज | चिंचवड
आज चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आज तीन वाजेपर्यंत पाच जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर आता 28 जण या निवडणूक रिंगणात असणार असून, दोन ईव्हीएम मशीन लागणार आहेत. भाजपकडून आश्विनी जगताप तर महाविकास आघाडी वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह 28 जण ही निवडणूक लढविणार आहेत.
या जागेसाठी 26 फेब्रुवारी रोजी निवडणूक पार पडणार आहे. राहुल कलाटे यांनी अर्ज माघारी न घेतल्याने ही निवडणूक तिरंगी होणार आहे. कलाटे यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी शिवसेनेचे सचिन आहेर यांनी राहुल कलाटे यांची भेट घेऊन विनंती केली होती. परंतु राहुल कलाटे निवडणूक लढविण्यास ठाम असून, तेही निवडणूक रिंगणात असणार आहेत.
Advertisement