शबनम न्युज | पुणे
संविधान अभ्यासक तसेच इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष -असलम इसाक बागवान यांनी कोंढवा भागात सफाई कामगार,मदरसांतील विद्यार्थी तसेच शालेय विद्यार्थी यांची अनुक्रमे शनिवार रविवार,बुधवार या दिवशी तर बैतूल उलम मदरसा येथे दररोज संविधान शाळा सूरू केली आहे. त्यास कोंढवा, महंमदवाडी,सय्यदनगर तसेच काळेपडळ येथून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.’आमचा भाग संपूर्ण संविधान साक्षर व्हावा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर तसेच फुले शाहू, गांधी या महामानवांचे सामाजिक विचार येथील स्थानिक रहिवासी यांच्यात मुरावेत. ते आचरणात,समाजा समोर येवुन, समाजात संविधानाची जागृती व्हावी, या दृष्टीने उचलेले हे पाऊल आहे ‘, असे असलम बागवान यांनी सांगितले.
या उपक्रमामध्ये असलम इसाक बागवान यांना सचिन अल्हाट, समीर मुल्ला,सादिक मजाहरी, इब्राहिम शेख हे उल्लेखनीय साथ देत आहेत. शिवाय वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय,स्वालेहात फिदा इंग्लिश मिडीयम स्कूल,ज्युपिटर इंग्लिश मिडीयम स्कूल, बैतूल उलम मदरसा,तसेच शिवनेरी गल्ली क्रमांक 9 मधिल मदरसा हे ही विशेष सहकार्य करीत आहेत.
यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांची ‘संविधान शाळा ‘ या महिन्या अखेर पर्यंत सूरू करणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच महिला सबलीकरण या करीता गृह उद्योग सूरू करणार असून 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त याची सूरूवात करण्यात येणार असल्याची माहिती असलम इसाक बागवान यांनी यावेळी दिली.