वाकड मधील सर्वसामान्य जनता जावेद शेख यांच्या पाठीशी
पिंपरी चिंचवड | शबनम न्यूज, प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होत आहे या निवडणुकीकरिता येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह वाकड मधूनच युवा नेते जावेद शेख निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून चिन्ह वाटप करताना, जावेद शेख यांना नारळाची बाग हे चिन्ह देण्यात आले आहे. वाकड परिसरातून युवा नेते जावेद शेख यांनी अनेक सामाजिक कार्य करून समाजात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्य लोकांच्या गरजा, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, भौतिक सुविधा या सर्व जावेद शेख यांनी जवळून पाहिल्या आहेत व या सर्वसामान्य लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांची प्रश्न सोडविण्यासाठीच आपण या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असल्याचे जावेद शेख यांनी वारंवार बोलून दाखविली आहे. त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असून, सर्वसामान्य कुटुंबातील मतदार हे जावेद शेख यांच्या पाठीशी आहेत. जावेद शेख यांना या निवडणुकीत प्रोत्साहन देण्यासाठी सर्वसामान्य जनताच त्यांना पाठिंबा देत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
सोमवारी जावेद शेख आपल्या प्रचाराचा शुभारंभ करत आहेत. काळेवाडी येथून जावेद शेख आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. नारळाची बाग या चिन्हावर आपण निवडणूक लढविणार असून, चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा विकासात्मक मतदारसंघ म्हणून ओळखला जावा, या हेतूने आपण कार्य करणार असून विकासाच्या मुद्द्यावरच तसेच सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व्यक्तींच्या विकासासाठीच आपण ही निवडणूक लढवीत असल्याचेही जावेद शेख यांनी सांगितले.