शबनम न्यूज | चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचे वातावरण आता प्रचार, प्रसार, घोषणा, भव्य सभा आरोप प्रत्यारोप याने ढवळून निघाले आहे. या सर्व निवडणुकीच्या वातावरणात वाकड परिसरातील अपक्ष युवा उमेदवार जावेद शेख यांच्या निवडणूक प्रचाराने आघाडी घेतली आहे.
सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला नेता, युवा सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असलेले जावेद शेख यांनी आपल्या प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे. मतदारांच्या वैयक्तिक भेटी गाठीवर त्यांनी प्रामुख्याने भर दिला आहे. तसेच भेटीगाठी, बैठकायांच्यावरही त्यांनी आपले लक्ष केंद्रित करीत शांत व संयम पणे आपला प्रचार सुरू ठेवत यामध्ये हळूहळू आघाडी घेतली आहे.
Advertisement