शबनम न्यूज | चिंचवड
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री विठ्ठल उर्फ नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाना काटे यांची ताकत दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक पक्ष संघटना या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने निवडणूक प्रचारात उतरत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जुने सहकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाने या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) २००९ सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सहकारी राहिला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पार्टीने या निवडणुकीत आपला उमेदवार जाहीर केला होता पण या पक्षाने नाना काटे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच या निवडणुकीच्या प्रचारात देखील ते सहभागी होणार आहेत. तसेच नाना काटे हेच बहुमताने विजयी होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
या पाठिंब्याने महाविकास आघाडीची ताकद या निमित्ताने वाढणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पार्टीने पाठिंबा दिल्यानंतर या पक्षाची ताकद असणाऱ्या भागात नाना काटे यांना मोठ्या प्रमाणावर मतदान होणार आहे.