शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
विवाहातीस मारहाण, शिवीगाळ करून मानसिक त्रास दिल्याबद्दल सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 मे 2016 ते 18 फेब्रुवारी 2023 या कालावधीत चिखली, पिंपरी चिंचवड येथे घडली. याप्रकरणी 30 वर्षीय विवाहातीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, सलमान खालिक मुजावर (वय 30) सुलताना खालील मुजावर (वय 50) खालिक अब्दुल रहमान मुजावर (वय 60) सद्दाम खालिक मुजावर (वय 30,सर्वजण रा. चिखली पिंपरी चिंचवड) तर मैनाझ स्रुराज शेख (वय 35 रा, मुंबई ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे लग्न झाल्यापासून विवाहातीस माहेराऊन पैसे घेऊन ये म्हणून मारहाण तसेच शिवीगाळ करून सतत मानसिक त्रास देण्याच्या हेतूने लहान मोठे वाद निर्माण करायचे. तसेच सलमान मुजावर हा विवाहातींवर चारित्र्याच्या संशयांवरून मारहाण करून शिवीगाळ करून वारंवार घटस्फोटाची मागणी करायचा तसेच पैशाच्या कारणावरून इतर छोट्या-मोठ्या कारणांवरून चारित्र्यावरून संशय घेऊन विवाहातीचा शारीरिक मानसिक छळ करायचे, याप्रकरणी विवाहातीने फिर्याद दाखल केली असून, सासरच्या लोकांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.