शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन भोसले यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला
मा विकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा प्रचार करत असताना करण्यात आला हल्ला
बाणेर येथील खाजगी रुग्णालयात सचिन भोसले यांच्यावर होत आहेत उपचार
पिंपरी चिंचवड शबनम न्यूज प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा प्रचार ठाकरे गटाचे शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले करत आहेत आज सायंकाळी डांगे चौक येथे ते प्रचार करत असताना काही अज्ञात व्यक्तींनी सचिन भोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये सचिन भोसले हे जखमी झाले असून त्यांच्या हाताला मार लागला आहे तसेच त्यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यापैकी एकाच्या पायालाही दुखापत झाली शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले हे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात करत असून काही अज्ञात व्यक्तींशी त्यांचा वाद झाला असल्याची माहिती मिळत आहे या वादातून त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे त्यांच्यावर बाणेर येथील एका खाजगी रुग्णालयात उच्चार सुरू आहेत.