महिलासाठी कॅन्सर शिबिर तपासणी
रावेत:. ओम प्रतिष्ठान अंतर्गत आणि रोटरी क्लब ऑफ आकुर्डी यांच्या विद्यमाने,
महिला दिनानिमित्त कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड मधील गरजू व कॅन्सरची लक्षणे वाटणाऱ्या महिला साठी ही सुवर्ण संधी आहे.
एक स्त्री ही आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र झटत असते पण स्वतःच्या तब्येती बाबत मात्र निष्काळजी पणा करते पण असे न करता स्वतःच्या आरोग्याबाबत महिलांनी जागरुक असावे व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती ओम प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ. वनिता सावंत यांनी केले आहे.
ही तपासणी विद्यंगान हायस्कूल, रावेत येथे दिनांक २५/०२/२०२३ , वार : शनिवार या दिवशी मोफत होणार आहे. सकाळी १०.००तेदुपारी २.०० या वेळेत होणार आहे.
या तपासणी साठी नाव नोंदणी what’sapp द्वारे करणे आवश्यक आहे.
मो.न. 8010925297
स्थळ: विद्यागण हायस्कूल, सर्वे. न.१२२ , लक्ष्मीनगर, भालचंद्र विहार जवळ ,रावेत ,पुणे.४१२१०१