शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी सकाळी ६ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत १०.४५ टक्के मतदान झालं आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या मतदारसंघात एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार आहे. पोटनिवडणुकीसाठी ५१० मतदार केंद्रावर मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत ३.५२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता त्यांनतर आता ११ वाजेपर्यंत १०.४५ टक्के मतदान करण्यात आले.
Advertisement