शबनम न्युज | भोसरी
अज्ञात इसमाने एचडीएफसी बँक खात्याची केवायसी पेंडिंग असल्याचा खोटा संदेश मोबाईलवर पाठवून फसव्या लिंक द्वारे एकाला 1 लाख 19 हजार 778 रुपयांना लुटले. हा प्रकार 2 मार्च 2023 रोजी घडला. या प्रकरणी युसुफ जब्बार शेख (वय 37, रा. कासरवाडी पुणे) असे फिर्याद दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना एचडीएफसी बँक खात्याची केवायसी पेंडिंग असल्याचा खोटा संदेश पाठवून फसव्या लिंक द्वारे एचडीएफसी बँक सारखेच बनावट पेज ओपन केले. फिर्यादी यांनी लिंक ओपन करून बँक खात्याची तपशील माहिती भरली, त्यानंतर फिर्यादी यांच्या बँकेतून 1 लाख 19 हजार 778 रुपये काढण्यात आल्याचा प्रकार घडला. फसवणूक झाल्याची लक्षात येताच फिर्यादी यांनी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात कलम 420, 465, 467, 471 भा.द.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.