शबनम न्यूज | निगडी
इलोहीम क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने मदनलाल डिंग्रा मैदान निगडी पिंपरी -चिंचवड येथे 6-7 मार्च रोजी पुणे शहरातील इंटर चर्च क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ख्रिस्ती युवकांमध्ये खेळाच्या द्वारे ऐक्यता, प्रीती यांच्या महत्त्वाबाबत जनजागृती करणे हा मुख्य उद्देश असल्याची प्रतिक्रिया यावेळी आयोजकांनी दिली.
यावेळी पास्टर. जॉनसन पौलोस, नितीन गायकवाड, इंजि. शौल कांबळे, सागर औताडे, संदेश बोर्डे, पास्टर दानियल अँथोनी, स्नेहल डोंगरदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अनेक पाळकानांनी देखील स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धेत आनंद घेतला. स्पर्धेचे विजेतेपद कोंढवा येथील आगापे क्रिकेट संघाने पटकावले तर उपविजेतेपद खडकी ऑल सँट चर्च यांनी पटकावले. पाहुण्यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली व विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
पास्टर, अभिषेक कुंवर, चंद्रकांत क्षीरसागर, अमोल औताडे, मंगेश लोणारे, आशिष पंडित यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.