शबनम न्यूज | मुंबई
आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांना 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीनही मंजूर करण्यात आला आहे. 2017 सालच्या एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामात अडथळा आणला होता. त्यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती. अखेर आज न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन वर्षाची तुरुंग शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, या न्यायालयाच्या निर्णयावर बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, या निर्णयाविरुद्ध विरोधात आम्ही वरच्या न्यायालयात दाद मागणार आहोत. कोर्टात एक बाजू ऐकली जाते, परंतु अधिकाऱ्यांनी काहीही खर्च केला नाही ही बाजू बघितली जात नाही, याचे दुःख: असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.