शबनम न्यूज | पिंपरी
सामाजिक कार्यकर्ते दिनेश यादव यांनी कुदळवाडी येथे सीरवी समाज बांधवांसोबत धुलीवंदन सणाच्या निमित्ताने होली का उत्सव साजरा केला.
यावेळी आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, सिरवी समाज बांधवांना सोबत, भगिनींसमवेत ‘होलीकोत्सव’ साजरा करण्याचा आनंद काही औरच! समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभलेला हा समाज शतकानुशतके देशाच्या कला आणि वेशभूषेच्या क्षेत्रात भर घालत आला आहे. त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांनी त्यांच्या या आनंदोत्सवात सहभागी होण्याचा केलेला आग्रह मोडता आला नाही.
Advertisement
सिरवी समाजाला एक वैभवशाली सांस्कृतिक इतिहास लाभला आहे. वाळवंटात राहणाऱ्या या समाजाने आपली लोकसंस्कृती कायम जपली आहे. पारंपारिक नृत्य आणि त्यातील वेशभूषा सुंदर आहे. त्याला एक रेखीव बाज आहे. समाजातील संस्कृती आपल्याला जपायची आहे.