चिंचवड | शबनम न्यूज
चिंचवडच्या भाजपच्या विजयी आमदार अश्विनी जगताप यांचा आज विधिमंडळात शपथविधी पार पडला. याचवेळी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनीही शपथ घेतली. त्यांनीदेखील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना अभिवादन करुन शपथविधीला सुरुवात केली.
चिंचवडमध्ये २००९ पासून २०१९ पर्यंत भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप निवडून आले होते. लक्ष्मण जगताप हे पहिल्यांदा अपक्ष लढले होते आणि त्यानंतर दोन टर्म ते भाजपकडून लढले. सलग तीन टर्म आमदार असल्याने त्यांनी चिंचवड शहराचा बराच विकास केला. त्यानंतर त्यांचा कर्करोगामुळे निधन झालं आणि त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली. त्यादेखील मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांचाच आज शपथविधी पार पडला.
Advertisement