पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
हिंदुस्थानचे आराध्य दैवत, रयतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कासारवाडी मध्ये एक गाव एक शिवजयंती साजरी करण्यात आली या शिवजयंती सोहळ्यासाठी समाजसेविका सौ. प्रतिभाताई रघुनाथ जवळकर यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले.
शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुख्यतः पारंपारिक वाद्याचा समावेश करण्यात आला होता, विविध ढोलताशा पथकांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये मातृभूमी ढोलताशा पथक, नाद ढोलताशा पथक, एकदंत ढोलताशा पथक, शिवस्पर्श ढोलताशा पथक,अष्टविनायक ढोलताशा पथक, ओम साई ढोलताशा पथक या पथकांचा सहभाग होता. या ढोलपथकातील मुलांचा जल्लोष पाहून सौ. प्रतिभाताईंनी देखील ढोल वाजवण्याचा आनंद घेतला.
तसेच या मिरवणुकीमध्ये इतिहासकालीन देखावे, छत्रपती शिवाजी महाराज, शिवकालीन प्रसंग अशा विविध प्रकारच्या वेशभूषा करण्यात आल्या होत्या. यामुळे या मिरवणुकीने शिवकाळ पुन्हा जिवंत केला. कासारवाडीतील लहान मुले, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते