शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
रुपीनगर तळवडे येथील शिवयोद्धा प्रतिष्ठाण तर्फे सालाबादप्रमाणे याहीवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. पारंपरिकरित्या शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजवलेली पालखी,छत्र चामरे, अब्दागिरी, पालखीत विराजमान असलेले शिवराय,किल्ले शिवनेरीवरून आणलेली शिवज्योत,पालखीसोबत फेटे घातलेला महिलावर्ग,पारंपरिक वेशभूषा केलेले बालमावळे, लाठीकाठी,तलवारबाजी, चक्री यांचे प्रात्यक्षिके करणारे मुले-मुली आणि शिवयोद्धा वाद्यपथकाच्या ढोलताशांच्या गजरात निघालेली मिरवणूक हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते.ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
मिरवणूक संपन्न झाल्यावर प्रतिष्ठाणतर्फे ह. भ. प. होनराजराजे मावळे यांचे शिवचरित्रपर कीर्तन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सरनोबत येसाजी कंक यांचे १३वे वंशज आकाश कंक आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांचे १४ वे वंशज दिनेश मालुसरे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमोल तुकाराम भालेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतिष्ठाणच्या सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले.कार्यक्रमप्रसंगी दत्तानाना पवळे,सुलभाताई उबाळे माजी नगरसेवक शांताराम भालेकर,पंकज भालेकर,प्रविण भालेकर,पांडुरंग भालेकर,संगितानानी ताम्हाणे,सुजातामामी काटे,शितलताई पवार,रविंद्र सोनवणे,धनंजय भालेकर,शांताराम भालेकर,धनाजी भालेकर,संपत भालेकर,तुकाराम भालेकर,रामभाऊ भालेकर,दौलत कुटे,उत्तम कांबळे,शंकर गवळी,कॅप्टन अशोक कदम,वसंत पतंगे काका,संदिपभाऊ जाधव,धनंजय वर्णेकर सर,शरद भालेकर,विशाल मानकरी,विलास भालेकर,प्रमोद भालेकर,बाप्पु गौंड,नितिन बोंडे,भाऊसाहेब काळोखे,तानाजी काळभोर,ह.भ.प. भानुदास महाराज वैराट,अशोक कोकणे,दादासाहेब नारळे,श्रीकांत वांद्रे, रामदास कुटे,सागर चव्हाण,रविराज शेतसंधी उपस्थित होते.