शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
राज्यात महायुती सरकार आल्यापासून त्यांनी ओबीसी व बलुतेदार समाजाच्या विकासासाठी विविध योजना व धोरणे राबवत असल्याने या समाजांना उभारी येण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन आमदार सौ.उमाताई खापरे यांनी केले.त्या पिंपरी चिंचवड बारा बलुतेदार संघाच्या व विविध समाज प्रमुखांच्या बैठकीत बोलत होत्या.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बलुतेदार संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी हे होते.यावेळी भाजपा सरचिटणीस विशाल वाळुंजकर,बारा बलुतेदार शहराध्यक्ष हेमंत श्रीखंडे,किशोर पवार,नानासाहेब सूर्यवंशी,चेतन वेळीस,नागेश कोकाटे सह विविध समाज प्रमुख आदी उपस्थित होते.
यावेळी समाज मागण्यांचे निवेदन आमदार उमाताई खापरे यांना प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी , विशाल वाळुंजकर व शहराध्यक्ष हेमंत श्रीखंडे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.राज्य शासनाने बलुतेदार समाजांच्या काही मागण्यांची पूर्ती केल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन प्रस्ताव मंजूर करण्यात आला.यावेळी साखर वाटप करण्यात आले.तसेच विविध समाज हिताच्या व नागरी कामासांठी निधी उपलब्ध करून देत भविष्यात याबाबत शासन स्तरावर उर्वरीत मागण्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आ.उमाताई खापरे यांनी सांगितले.विविध सामाजिक व इतर मागण्यांचा आढावा प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांनी घेतला.बैठकीचे सुत्रसंचालन राहुल धोत्रे तर प्रास्ताविक हेमंत श्रीखंडे तर आभार प्रदर्शन नागेश कोकाटे यांनी केले.