शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव आळंदी पुणे शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले स्मृती दिन महाविद्यालयांमध्ये सकाळी ०९.०० वाजता साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.परमेश्वर भताशे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संजीव कांबळे (कार्यक्रम अधिकारी रासयो ) यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात होते.या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले स्मृती दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख वक्त्ते म्हणून लाभलेले. प्रा. माणिक कसाब सर (राज्यशास्त्र विभाग प्रमुख) यांनी भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत अनेक उदाहरणे देत विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून सुरुवातीपासून त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरिता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता कसे खर्ची घातले. समाजात प्रचलित असमानता दूर करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम कशाप्रकारे घेतले, प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी कसा सामना केला आणि स्त्रिशिक्षणाची ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली असे अनेक दाखले देत. त्यांच्या स्मृतीना उजाळा दिला.
यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला उजाळा देत. सावित्रीबाईंनी त्यांचे काम केवळ शिक्षणापुरते मर्यादित केले नाही, तर विधवा आणि मुलांच्या हत्या थांबवण्यासाठी, शिक्षणासाठी,गरीब अस्पृश्य समाजासाठी मोलाचे कार्य केले असे अनेक दाखले देत, मार्गदर्शन असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मा. श्री मयूर ढमाले सर खजिनदार श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. कैलास अस्तरकर यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक संजीव कांबळे राष्ट्रीय सेवा योजना विभाग राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी यांनी केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. प्रेरणा पाटील प्रा. सविता मानके प्रा.सोनाली अभंग डॉ.छाया जोशी प्रा. सोनाली तापकीर प्रा. यशोदा खुळखुळे प्रा.दिपाली ताम्हाणे प्रा.दिपाली सोनवणे प्रा. राजश्री खडके, प्रा. शाहूराज येवते, डॉ. पांडुरंग मिसाळ,डॉ. राजू शिरस्कर प्रा. विश्वनाथ व्यवहारे, प्रा. विकास दिघे, प्रा.तसेच कार्यालयीन कर्मचारी वर्षा ताजने, नेहा लांडगे आणि महाविद्यालयाची कार्यालयीन अधिक्षक प्रवीण भावे यांचे अनमोल असे सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमासाठी रामचंद्र औटी पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला .या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.