शबनम न्युज | हिंजवडी
महिलेचे अश्लील व्हिडिओ मैत्रिणीला पाठवणाऱ्या तरुणासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 10 मार्च रोजी सायंकाळी मारुंजी रोड, हिंजवडी येथील एका हॉस्पिटलमध्ये घडला.
आकाश लवानिया (वय.26, रा.मारुंजी रोड, हिंजवडी) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने हिंजवणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला हॉस्पिटलमध्ये काम करतात. दरम्यान, रूमच्या बाथरूम मध्ये महिला आंघोळ करीत असताना, आरोपी आकाशने मोबाईलवर त्यांचा व्हिडिओ काढला. त्यानंतर व्हिडिओ त्याच्या प्रेयसीला पाठवून फिर्यादी यांची बदनामी केली. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.