शबनम न्युज | तळेगाव दाभाडे
सोमाटणे टोल नाका हटविण्यासाठी तळेगाव येथील जोशी वाडी मधील श्री विठ्ठल मंदिरामध्ये उपोषण करण्यात आले. सोमाटणे टोलनाका हटविण्यासाठी अनेक संस्थांकडून आंदोलने उपोषणे करण्यात आली. मात्,र सोमाटणे टोलनाका यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने टोल नाका हटविण्यासाठी उपोषणे सुरूच आहेत.
सोमाटणे टोलनाका हा ज्या ठिकाणी आज आहे, त्या ठिकाणी त्याला मंजुरी नाही. भारतीय राजपत्रांमध्ये तो देहू रोडच्या हद्दीमध्ये दाखविला आहे. तो अनधिकृत सोमाटणे येथे टोल वसुली करत आहे. या टोल नाक्याच्या माध्यमातून तळेगाव नगरपालिका, सोमाटणे ग्रामपंचायत, अगर देहूरोड कंटोन्मेंट या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारचा कर दिला जात नाही. हा अनधिकृत टोलनाका त्वरित बंद करावा, या मागणीसाठी सर्वसामान्य जनतेकडून ‘सोमाटने टोलनाका हटाव’ कृती समितीच्या वतीने प्रमुख किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण दिनांक 11 रोजी पासून सुरू करण्यात आले.