शबनम न्युज | हिंजवडी
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला गाडीत बसवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. हा प्रकार हिंजवडी येथील लाईफ रिपब्लिकन सोसायटी समोर रविवारी (दि. 12) रोजी सकाळी पावणे दहा वाजता घडला.
या प्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे. त्यानुसार जसपाल एकबाल सिंह (वय 47, रा. मुळशी, मुळ. गुजरात) यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत महिला क्लासला जाण्यासाठी बस स्टॉप वर थांबली होती. त्यावेळी आरोपी त्याची कार घेऊन तिथे आला त्याने फिर्यादी यांना हा रस्ता हिंजवडी चौकाकडे जातो का? असे विचारले त्यावर फिर्यादीने हो असे उत्तर दिले. तुम्हाला तिकडे जायचे असेल तर मी सोडतो, असे आरोपी म्हटल्याने फिर्यादी त्यांच्या गाडीत बसल्या दरम्यान, आरोपीने गैरवर्तन करून तसेच अश्लील भाषा वापरून फिर्यादी यांचा विनयभंग केला. तसेच फिर्यादी गाडीतून उतरत असताना लगट करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याबाबत अधिक तपास हिंजवणी पोलीस करीत आहेत.