शबनम न्युज | पिंपरी
प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक क्षणाला, समाजात स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत,परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात, स्वत:च अस्तित्व सिध्द करणाऱ्या महिलांचा ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ या महिला दिनाचे औचित्य साधून समाजसेविका प्रतिभा रघुनाथ जवळकर यांनी कासारवाडी परिसरातील महिला-भगिनींसाठी विविध स्पर्धा व मनोरंजक खेळ आणि ‘ती’ चा सन्मान सोहळा कासारवाडी येथील योग साधना हॉल येथे कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून समर्थ महिला बहूउद्देशिय संस्थेच्या संस्थापिका सौ.राजश्री ताई गागरे या उपस्थित होत्या. सुरूवातीस सरस्वती देवीचे प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महिलांसाठी आयोजित मनोरंजक खेळ, रॅम्प वॉक, गेम्स शो, गाणी, गप्पा गोष्टी, उखाणे यांची रेलचेल आणि बरचं काही हा कार्यक्रम पार पडला. या सर्व कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलावर्ग सहभागी झाला आणि त्यांनी विविध स्पर्धेचा मनसोक्त आनंद घेतला.