पिंपरी चिंचवड वृत्तसंस्था
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी संप सुरू आहे सलग पाचव्या दिवशी शासकीय कार्यालयाचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली, कार्यालयांचे कामकाज सलग सात दिवस बंद आहे दरम्यान मागण्या मान्य होईपर्यंत आपला संप सुरूच ठेवणार असल्याचे कर्मचारी संघटने कडून सांगण्यात आले आहे त्यामुळे सर्वसामान्य यांची चांगलीच परवड होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त, सहकार, कृषी आणि साखर आयुक्तालय, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग, जलसंपदा विभाग ,ससून रुग्णालय, जिल्हा परिषद प्रादेशिक परिवहन कार्यालय, भूमी अभिलेख, विवाहनोंदणी कार्यालय ,समाजकल्याण इतर मागास, बहुजन कल्याण ,महिला व बालविकास, उत्पादन शुल्क, रेशीम विभाग अशा विविध विभागांमधील दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाली आहेत सुरुवातीला एक दोन दिवस हा संप चालेल असे वाटत असताना आता एक आठवडा पूर्ण होऊनही संप सुरूच असल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.