पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकांचा मोर्चा व आंदोलन.
शबनम न्यूज प्रतिनिधी
महावितरण विभाग वतीने प्रस्तावित असलेल्या वीजदर वाढीविरोधात पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजक 24 मार्च रोजी महामोर्चा आंदोलन करणार आहेत या आंदोलनात सर्व उद्योजकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेमार्फत पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकांना आवाहन करण्यात आले आहे की, महावितरणने एप्रिल महिन्या पासून चालू वर्षाकरिता ३७ टक्के व पुढील वर्षी ४१ टक्के वीज दर वाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे मंजुरीकरिता पाठविला असून हा वाढीव वीज दर रद्द करावा या वाढीव वीज दराचा निषेध करण्याकरिता शुक्रवार दि.२४/०३/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता महावितरण कार्यालय, पावर हाउस, निगडी-भोसरी रोड, भोसरी येथे पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या माध्यमातून मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे. तरी पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून मोर्चा व आंदोलन यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेमार्फत जाहीर आवाहन करण्यात आले आहे.