शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
विज बिल समस्येबाबत शिवसेनेच्या उद्योग सेना वतीने महावितरण विभागाला भेट देऊन निवेदन देण्यात आले,
शिवसेना उद्योग सेनेचे पदाधिकार्यानी महावितरणच्या भोसरी पॉवर हाऊस चे मुख्य अभियंता श्री उदय भोसले साहेब आणि गणेशखींडचे(पुणे) सी एस साहेब ह्यांची भेट घेतली.
व उद्योजकांच्या वीज समस्येबाबत चर्चा केली या चर्चा दरम्यान विज बिल संदर्भातील काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या , काही महिन्या पासुन असे आढळून आले आहे की विजेचे रिडिग महावितरण कडुन दर महा वेळेत घेतले जात आहे,परंतू त्याचा तपशील, बिलाची छापई,आणि बिलाचे वितरण हे वेगवेगळ्या कंत्राटी करारावर दिले गेले आहेत,ह्या मुळे बिलाला ग्राहकाकडे येण्यास उशीर होतोय असे काही महिन्यापासून चालले आहे.
ग्राहकांना विशेष करुन उद्योजकांना व कारखांनदाराना बिल सवलती तारखे नंतर मिळतात, जेणे करुन जास्तीचा खर्च होतोय .काहीना विज बिल मिळत नाही आणि मोबाइल वर पाठवल्याचे कारण पूढे केले जात आहे.
मग महवितरण कडुन विज कापण्यात येते किंवा कंत्राटवर/महावितरणाची मुलं/अधिकारी त्यांचा कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या वसुली साठी येतात हे त्यांच्या निदर्शनास आणुन दिले.
अवाजवी बिल,मिटर काढून नेणे,रिडिंग तपशील नीट न दिल्यामुळे आलेला विज भरणा,तक्रार दिल्या नंतर सूद्धा त्या बद्दलची दखल न घेणे हे सगळ असुन विज दर वाढवण्याचा घाट घालण्यात येत आहे. उद्योग क्षेत्रात ह्याची अस्वस्थता आहे.
ग्रहकना आणि उद्योजकना होणाऱ्या त्रासा संदर्भात तोडगा काढावा याबाबत चे निवेदन देण्यात या समस्या जाणून महावितरण विभागा वतीने ही सकारात्मकता दाखविण्यात आली व या सर्व समस्या लवकरात लवकर सोडविणार असल्याचे आश्वासन महावितरण विभागाचे वतीने उद्योग सेनेला देण्यात आले
या वेळी उद्योग सेनेचे अध्यक्ष कार्तिक गोवर्धंन,उपाध्यक्ष प्रसादजी माळगावकर,मंगेशजी साठे,सह समन्वयक सचिनजी बोधणी,सचिव प्रसादजी बोधे,सलागार निखिलजी येवले,सदस्य झा साहेब,पंकज कुलकर्णी,गणेश ढगे,नरेंद्र चिपळूणकर,अभिजीत पाटील उपस्थित होते.