पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात महिलांसाठी च्या कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन हे समीर मासुळकर ( मा.नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर.) तसेच सौ.कविताताई खराडे (वरिष्ठ महिला कार्याध्यक्ष) आणि अश्विनी महावीर कांबळे (सरचिटणीस राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर) यांनी केले होते. महिलांसाठी कॅन्सर/ कर्करोग तपासणी शिबिर हे डॉक्टर मुफित बेग यांच्या प्रयास संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये पुढील तपासण्या करण्यात आल्या होत्या.
१) ब्रेस्ट कॅन्सर ( स्तन कर्क रोग) ४० ते ६९ वयापर्यंतच्या महिलांसाठी.
२) सर्व्हाकल कॅन्सर (गर्भाशयाचा कर्करोग) ३० ते ४९ वयापर्यंतच्या महिलांसाठी.
या शिबिराचे उद्घाटन डॉ.सई मराठे यांनी केले होते तसेच यावेळी सौ.वैशालीताई गव्हाणे (अध्यक्ष राजमाता जिजाऊ महिला महासंघ) सौ.माधुरीताई कोले (अध्यक्ष अखिल भारतीय महिला आर्य वैश्य समाज) सौ.अश्विनीताई लांडे (सामाजिक कार्यकर्त्या) सौ.उषाताई उभारे (उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस) सौ.जयश्रीताई निमट (उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी) सौ.नाझनिन पठाण (वॉर्ड अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी) या महिलांनी शिबिरासाठी विशेष उपस्थिती दर्शविली.
प्रयास या संस्थेने कर्क रोगा संदर्भात पूर्ण वैद्यकीय मदत चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिल्यामुळे सर्व महिलांना या कर्करोग तपासणी शिबिराचा पुरेपूर फायदा घेता आला..!