वडगाव मावळ (पुणे) : वडगाव पोलिसांच्या हद्दीत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी छापा छापा टाकून ७ लाख ५९ हजारांचा ऐवज जप्त केला.लोणावळा विभागीय पोलिस कार्यालय यांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातेगावात भुंडे वस्ती येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळत असल्याची माहिती सत्यसाई कार्तिक यांना मिळाली.रात्रीच्या वेळी पोलिस हवलदार सचिन देशमुख, अंकुश नायकवडी, सुभास शिंदे, अंकुश पवार, दत्ता शिंदे, चालक होले यांनी या ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणाहून रोख रक्कम, किया कार, मोटारसायकल, चार मोबाइल जप्त करण्यात आले.