शबनम न्युज | भोसरी
भोसरी येथे अल्पवयीन मुली सोबत बलात्कार केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मे 2020 ते 15 जानेवारी 2023 दरम्यान महात्मा फुले नगर, साईकृपा निवास, महावीर वॉटर सप्लायर चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे येथे घडली. या प्रकरणी एका 18 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार, भिकन उर्फ गौरव विष्णू जाधव (वय 28 , रा. देवकर वस्ती,भोसरी, पुणे, मुळगाव. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही तिच्या आजी कडे भोसरी येथे आली असताना, तिच्या आजीच्या घरी आरोपी हा वॉटर सप्लायर चे काम करत होता. फिर्यादी या अल्पवयीन असल्याची माहित असताना देखील आरोपीने तिच्यासोबत जबरदस्तीने वारंवार शरीर संबंध केले. तसेच फिर्यादीने विरोध केला असता, आरोपीने फिर्यादी यांना मारहाण देखील केली. तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार, आरोपी याच्या विरोधात भादवी कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.